” बुडत्या व्यक्तीचे जीव वाचविण्यात ट्राफिक पोलीसांना यश “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
नवी मुंबई
काल दि. ०९ मार्च २०२३ रोजी प्रवीण सुनील आढाव वय अंदाजे ३३ वर्षे, राहणार घनसोली या व्यक्तीने कौटुंबिक भांडणाच्या कारणावरून वाशी खाडी ब्रिज वरून अचानक पाण्यात उडी मारली.
हि माहिती एका कार चालकाने वाशी खाडी ब्रिज येथील ट्राफिक पोलिसांना कळवली. त्याक्षणी पोलीस अंमलदार आडेकर (१२२९६), बर्डे (३०८५) आणि ठोंबरे (१२१०१) या तीन ट्राफिक पोलिसांनी तात्काळ बोट घेऊन पाण्यामध्ये गेले व प्रवीण सुनील आढाव या व्यक्तीचे जीव वाचवले.
त्यानंतर प्रवीण सुनील आढाव या व्यक्तीला वाशी खाडी ब्रिज ट्राफिक पोलिस चौकी येथे घेऊन त्याची नोंद स्टेशन डायरीला करून वाशी पोलीस स्टेशन च्या बिट मार्शल यांच्या हवाली करण्यात आले.