
पिंपळखुटा येथील युवकाची ‘वृक्ष अधिकारी’ म्हणुन निवड.
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, दारव्हा
दारव्हा तालुक्यातील पिंपळखुटा या गावातील तरुणांनी आपल्या जिंद व चिकाटीने गरुड झेप घेऊन आपल्या आई-वडीलांच्या सोबत पिंपळखुटा या गावाचे नाव लौकिक केले आहे.
पिंपळखुटा येथील श्री. राजु नारायण चव्हाण यांच्या मुलाने आपल्या अभ्यासाच्या जोरदार ‘रायसेना स्टडी सेंटर अमरावती’ येथे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याची निवड “वृक्ष अधिकारी (ट्री ऑफीसर)” म्हणून महानगर पालिका नागपूर येथे निवड झाली आहे.
त्यांच्या निवडीमुळे पिंपळखुटा गावात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले असून संपूर्ण गावात डफड्याच्या तालावर श्री. विवेक राजु चव्हाण (ट्री ऑफीसर) तसेच श्री. रुपेश युवराज चव्हाण (एस.टी महामंडळ-तिकीट निरिक्षक) या पदावर निवड झाल्या मुळे पिंपळखुटा गावाच्या वतीने त्यां दोन्ही युवकांचा सत्कार करण्यात आला.
पिंपळखुटा गावातील ‘संत सेवालाल महाराज मंदिरात’ या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या समारोपात तरुण पिढीच्या युवकांना यवतमाळ जिल्हा गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. किशोर चव्हाण यांनी शिक्षणा बाबतचे महत्त्व पटवून दिले.
या सत्कार सोहळ्यात श्री. रमेश चव्हाण, श्री. किशोर चव्हाण, श्री. विष्णू चव्हाण, श्री. अमर राठोड, श्री. विशाल चव्हाण, श्री. किरण चव्हाण, यांच्यासह पिंपळखुटा गावातील अनेक नागरिक तथा युवक उपस्थित होते.