
“विनोद पत्रे यांची दुरदर्शन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
यवतमाळ येथील जेष्ठ पत्रकार तथा पत्रकार संरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. विनोद पत्रे यांनी १९ वर्षी पुर्वी आपल्या पत्रकारीतेची कारकीर्द सुरु केली.
पत्रकार क्षेत्रात काम करतांना आजवर विनोद पत्रे यांनी स्थानिक तसेच राज्यस्तरीय विवीध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनाशी निगडीत विषयावर भेदक आणि प्रभावी पत्रकारिता केली आहे, त्याच सोबत विनोद पत्रे यांनी देशपातळीवरील प्रतिष्ठीत वृत्तसंस्था पि.टी.आय यामध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्रकार प्रवासात अनेक वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. विनोद पत्रे यांची दुरदर्शन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून या निवडी बाबत विनोद पत्रे यांना यवतमाळ-वाशिम जिल्हाचे खासदार मा. संजय देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या असून त्याच बरोबर विनोद पत्रे यांच्या सोबत पत्रकारिता करणारे मित्र मंडळी यांनी देखील भर भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
विनोद पत्रे यांची यवतमाळ जिल्हा दुरदर्शन प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या सोबत महाराष्ट्र न्युज लाईव्ह, मुंबईचे संपादक दिलीप चव्हाण यांनी विनोद पत्रे यांच्याशी यवतमाळ विश्रामगृहावर बात चिंत केली.