
“प्रशांत राठोड (कक्ष अधिकारी) यांच्या तर्फे आपदग्ग्रस्तांना किट वाटप”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, माहुर
माहुर तालुक्यात तिन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे इवळेश्वर, तांदळा, मदनापुर, हिंगणा या गावासह इतर गावात अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काहींच्या घरावर झाडे पडलीत, घरावरील छत, टिन-पत्रे उडून गेलीत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावरती पडला, तर काही ठिकाणी पाळीव प्राणी देखील मृत्यू मुखी पडले. या नैसर्गिक आपत्ती मुळे संपूर्ण गावात शोकाकुल पसरली ही घटना मनाला सुन्न करणारी होती.
अपदाग्रस्थ लोकांना खाण्या-पिण्या साठी अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती प्रशांत राठोड मित्र मंडळ आणि सेवा संकल्प प्रतिष्ठानला माहिती मिळताच वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे नुकसान झालेल्या लोकांना या मंडळ व प्रतिष्ठान तर्फे जिवन उपयोगी वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रशांत भाऊ राठोड मित्र मंडळ तसेच सेवा प्रतिष्ठान च्या वतीने दिनेश पवार, प्रदिप पवार, राजु पवार, बंडू राठोड, अर्जून जाधव, गजानन जाधव, सरपंच संतोष जाधव, गणेश जाधव, नूरभाई, यांच्या सह इवळेश्वर, मदनापुर, तांदळा येथील अनेक नागरिक उपस्थित होते.