
“सहा वर्षाच्या चिमुरडीचा रोपटे जीवंत ठेवण्याचा प्रयत्न“
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, मानोरा
काटखेडा येथील शेतकरी भावराव सक्रु राठोड हे शेतकरी आपल्या कुटुंबासह मागील १५ वर्षा पासून आपल्या शेतात राहतात आणि आपला शेती व्यवसाय करतात. भावराव सक्रु राठोड यांच्या कडे ४ एकर शेती असून त्या शेतात त्यांनी कापुस पिकाची लागवड केली आहे.
मागील १५ दिवसापासून पाऊस आला नाही, पावसा अभावी आपल्या शेतीमधील कपाशीची पिके, रोपटे मरु नये म्हणून शेतीमधील कपाशीच्या रोपट्यांवर ६ वर्षाची चिमुरडी रोपट्यांवर पाणी टाकून कपाशीच्या रोपट्यांला जीवंत ठेवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करुन आपल्या कुटुंबाला धिर देण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत आहे. खरोखर या ६ वर्षाच्या मुलीचे जेवढे कौतुक यावे ते कमीच पडते.