
” राज्यात पाच हजार किमीचे जाळे निर्माण करणार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
मुंबई
शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सत्तेत १०० दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून, येत्या काळात अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्याचे निश्चित केले आहे. यात प्रामुख्याने राज्यात पाच हजार किलोमीटरचे महामार्ग तयार करण्याचा संकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने सोडला असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. याबरोबरच भिवंडी-कल्याण शीळफाटा रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणाला वेग देण्यात येणार आहे. त्यासाठी ५६१ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.