
“हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याकरिता मुदतवाढ “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
महाराष्ट्राचे राज्याचे परिवहन आयुक्तांनी विवेक भिमनवार सरांनी दि. ०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (SHRP) दि. ३१/०३/२०२५ पूर्वी बसविण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर परत दि. ३०/०६/२०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. परत नागरीकांन कडून सतत मुदतवाढीची मागणी केली जात असल्यामुळे महाराष्ट्राचे परिवहन आयुक्तांनी दि. २० जानेवारी २०२५ रोजी एक परिपत्रक काढून दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत अंतिम मुदत देऊन दि. ०१/०४/२०२५ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे.
यानंतर ज्या वाहनधारकांननी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनांनवर बसविली नसेल त्या वाहनांवर वायूवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे या पत्राकातून कळविले आहे. तथापि दि. १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी ज्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केले आहे त्या वाहन मालकावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे सुध्दा या परिपत्रक म्हटले आहे.
तेव्हा सर्व वाहन धारकांनी दि. १५ ऑगस्ट २०२५ पुर्वी आपल्या वाहनांनवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून भविष्यात होणाऱ्या दंडात्मक कारवाई पासून आपला बचाव करावा.