
“ भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, यवतमाळ
दि. १ जुलै २०२५ रोजी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य या समितीने आपल्या समाजाच्या विविध मागण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रामुख्याने महिलांचा सहभाग अधिक प्रमाणात होता.
यावेळी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना प्रत्यक्ष भेटून मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर श्रीमती पपिता ईसु माळवे, श्रीमती रेशमा संदीप राठोड, श्रीमती स्वाती खंडागळे, अरविंद बोरकर, सोमनाथ पवार, श्रीमती हिना पवार, श्रीमती दुर्गा भोसले आदींनी स्वाक्षऱ्या केल्या असून मोर्चात अल्प वयीन बालकांचाही समावेश होतो.
मोर्चेकर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले असतांना त्यांचे सोबत वृत्तपत्र प्रतिनिधी सुध्दा होते. जिल्हाधिकारी कार्यालया तील शिपायांनी गोपनीयतेचे कारण सांगून पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालय जाण्यापासून रोखले.
शासनाच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयची निर्मिती शासनाने केली असून सर्व सामान्य नागरिकांचे निवेदन स्विकारते वेळी पत्रकारांच्या उपस्थित मा. जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्विकारल्यास त्या ठिकाणीची गोपनीयता भंग कशी होते ? हे सांगायला कोणी तयार नव्हते.
मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
१) भटक्या विमुक्त सामुदयाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे.
२) नागरिकत्वाचे पुरावे:- गृह चौकशीच्या आधारे जातीचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळावे.
३) आज रोजी हा समाज जी जमिन वापरत आहे, गायरान, गावठाणा, वन जमिन, ही नियमित करण्यात यावी.
४) भटक्या विमुक्त सामुदायांवरील अन्याय अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी ॲट्रोसिटी सारखा स्वतंत्र कायदा करुन संरक्षणकवच द्यावे.
५) ३१ ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून जाहीर करण्यात यावा.
आदी मागण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे काढण्यात आला.