♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“३६ हजारांची लाच घेताना वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, जळगाव

 

एका शेतकऱ्याला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह लिपिक आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. पारोळा येथे झालेल्या या कारवाईमुळे जळगावच्या वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

 

पाचोरा तालुक्यातील सडावण शिवारातील एका शेतकऱ्याला त्याच्या आणि नातेवाईकांच्या शेतात बांबू लागवड करायची होती. यासाठी ‘अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपीक लागवड’ या शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केले होते. या कामासाठी एकूण चार फाईल्स तयार करण्यात आल्या होत्या.

 

सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) मनोज बबनराव कापुरे यांच्याकडे पारोळा येथील अतिरिक्त कामकाजाचा कार्यभार होता. या कामासाठी तक्रारदार शेतकरी २३ जुलै रोजी त्यांना भेटले असता, मनोज कापुरे यांनी प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांप्रमाणे एकूण ४० हजार रुपयांची मागणी केली.

 

लाचेची मागणी ४० हजारा,तडजोड ३६ हजारांवर

 

लाचेच्या रकमेवरून झालेल्या तडजोडीअंती ३६ हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी ३५ हजार रुपये स्वतःसाठी आणि १ हजार रुपये लिपिक निलेश मोतीलाल चांदणे यांच्यासाठी असल्याचे कापुरे यांनी सांगितले. ही रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील याच्याकडे देण्यास सांगण्यात आले.

 

जळगाव एसीबीचा यशस्वी सापळा

 

या प्रकारानंतर शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, कंत्राटी कर्मचारी कैलास पाटील याने पंचांसमक्ष ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर या कटात सहभागी असलेल्या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली.

 

अटक:

१)मनोज बबनराव कापुरे (वय ५४): वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा (अतिरिक्त कार्यभार – अमळनेर)

२) निलेश मोतीलाल चांदणे (वय ४५): लिपिक, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारोळा.

३) कैलास भरत पाटील (वय २७): कंत्राटी कर्मचारी (चालक), रा. मोरफळ, ता. पारोळा.

बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129