
“काँग्रेसचे कार्यकर्ते शालीकराव मुधाने अनंतात विलीन”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
दारव्हा तालुक्यातील पेकर्डा येथील शालिकराव देवरावजी मुधाने, वय ७० वर्षे यांचा सावंगी मेघे येथे अल्पशा आजाराने दि. २८/१०/२०२५ रोजी निधन झाले.
दि. २९/१०/२०२५ रोजी दूपारी २-१७ मिनीटांनी त्यांचा बौद्धीक पध्दतीने अंत्यविधी स्मशानभूमी दारव्हा येथे पार पडला. अंतविधी समय त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अंत विधी आटोपल्यानंतर लगेच स्व. शालिकरावजी मुधाने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, राहूल ठाकरे माजी जि .प. अध्यक्ष यवतमाळ, अमोल राठोड माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प. यवतमाळ, पाचकोर सर तळेगांव यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
स्व. शालिकरावजी मुधाने यांच्या पाठीमागे पत्नी एक मुलगा रूपेश आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे. शालिकरावजी मुधाने यांचे आत्म्याला चिरकाल शांती मिळावी अश्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





