♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“आमरण उपोषणाला बसलेले नायक श्री. विजय चव्हाण यांची विविध मंत्र्यांनी घेतली भेट”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, जालना 

 

जालना येथील अहिल्यादेवी स्मारक, शासकीय विश्रामगृहाजवळ बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले नायक श्री. विजय चव्हाण यांची मा. ना. श्री. संजय राठोड मंत्री, मृदु व जलसंधारण, तसेच पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री व जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे, जालना विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. अर्जुन खोतकर यांच्यासमवेत भेट घेतली.

 

या भेटीदरम्यान बंजारा समाजाच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या मागण्यांमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करणे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या बांधवांच्या वारसांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देणे, तसेच बंजारा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करणे यांचा समावेश होता.

 

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत या विषयावर सकारात्मक चर्चा केली. त्यांनी विजय चव्हाण आणि उपस्थित समाजबांधवांना आश्वासन दिले की, सरकारच्या वतीने बंजारा आरक्षणासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.

 

तसेच, ज्या मागण्या तत्काळ पूर्ण करता येतील त्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही देत सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवावा आणि उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. या विनंतीनंतर श्री. विजय चव्हाण यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी उपस्थित समाज बांधवांना सांगितले की, लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल.

 

या प्रसंगी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सामाजिक कार्यकर्ते अविनाश चव्हाण, उद्धव पवार, माधव चव्हाण, बापूराव राठोड, उत्तम चव्हाण, फुलसिंग जाधव, ह.भ.प. विठ्ठल महाराज, संदीप जाधव, राजेश पवार, कैलास चव्हाण, विलास राठोड, डॉ. आशिष राठोड, सुरेश पवार, ॲड. सुभाष राठोड, नितीन राठोड, युवराज राठोड, राजू नायक, जिजाबाई जाधव, पी.टी. चव्हाण, राजपाल राठोड, जयकुमार राठोड, सुधीर राठोड, रविकांत राठोड, कुंदन राठोड, मोहन राठोड, विक्रम चव्हाण, बी.बी. जाधव, अजूभाऊ राठोड, किसन राठोड, मदन राठोड यांच्यासह हजारो समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129