
“मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे अकोल्यातील भाजीपाला बाजारातील व्यापारी चिंतेत”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, अकोला
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मोठे पडसाद अकोल्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य मंत्रिमंडळाने एका निर्णयाद्वारे २५,५७९.८२ चौरस मीटर जमीन अकोला महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ही जमिन अकोल्यातील शहर बस स्थानक, भाजीपाला बाजार आणि व्यावसायिक संकुलासाठी हा निर्णय शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जात असला तरी, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मात्र या निर्णयामुळे तीव्र असंतोष पसरला आहे.
या निर्णयामुळे पारंपारिक बाजार व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, अशी भिंती लहान व्यावसायिकांना वाटत आहे. निर्णयामुळे छोटे दुकानदार, फेरीवाले आणि मजुरांनसह ७०० रोजगार धोक्यात येईल, ज्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.
जनता भाजी बाजार संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसेन यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितले की, महसूल मंत्रालयाने यापूर्वीही याबाबत आदेश दिले होते, मात्र त्यावेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतले गेले नाही. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर अन्याय झाला, तर समिती न्यायालयात दाद मागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.





