
“ससूनच्या वैद्यकीय अहवालात सगळं समोर येईल”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, पुणे
पुण्यातील रेव्ह एका पार्टीवर दि. (२७ जुलै) पोलिसांनी धाड टाकली. लया कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जनांना अटक करण्यात आली.
सदर प्रकरणी सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकर सह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवालातून समोर आले आहे.
पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलीसांनी अटक करुन त्यांची ससून रूग्णालयात वैदयकीय तपासणी केली असता सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाह पोलीसांनी दिलाय. सातपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
पुणे पोलिसांनी छापा टाकून एकानाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पार्टी करताना २७ जुलै रोजी पहाटे अटक केली. या पार्टीत अमंली पदार्थ सापडल्याचा पुणे पोलीसांचा आरोप आहे. २६ जुलै रात्री पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर ही पार्टी सुरु झाली होती. मात्र पोलीसांच्या मते अशीच पार्टी २५ जुलैला देखील झाली होती असा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी तो फ्लॅट बुक केला होता.
त्यामुळे पुणे पोलीस शुक्रवारी २५ जुलैला झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत. त्यासाठी ज्या फ्लॅटमधे पार्टी झाली तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणार आहेत.
अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे :
१) प्रांजल मनिष खेवलकर – (वय ४१)
२) निखिल जेठानंद पोपटाणी – (वय ३५)
३) समीर फकीर महमंद सय्यद – (वय ४१)
४) सचिन सोनाजी भोंबे – (वय ४२)
५) श्रीपाद मोहन यादव – (वय २७)
६) ईशा देवज्योत सिंग – (वय २३)
७) प्राची गोपाल शर्मा – (वय २२)
अटकेत असलेल्या आरोपींचे वकील यांच्या सोबत मिडिया प्रतिनिधींनी संवाद साधला असता डॉ. प्रांजल खेवलकर यांनी कोणतेही आपली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा त्यांच्या कडून ते जप्तही करण्यात आले नसल्याचे त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी मिडिया प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले या प्रक्रणात २ ग्रॅम व ७ मिलीग्रॅम आमली पदार्थ पोलीसांना सापडल्यामुळे याप्रकरणातील आरोपितांनवर बेलेम गुन्हा दाखल झाल्याचेही वकीलांनी सांगितले.