
“मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा शेतकऱ्यांचा दिवाळी साजरी न करण्याचा एकमताने निर्णय”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
यावर्षी तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस येऊन संत्रा फळबागाची फूट लवकर झाली व जून महिन्यामध्ये पावसाचा फार मोठा खंड पडला त्यामुळे संत्रा फुलाची व फळांची पूर्णपणे गळण झाली आहे.
जून महिन्यातील पावसाच्या खंडामुळे मानोरा तालुक्यातील संत्राचे बागेचे पूर्णपणे 100 % नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकरी यांनी आतापर्यंत फळबाग संत्रावर चाळीस टक्के एवढा खर्च केला आहे.
संत्रा फळबागांना खर्च हा इतर पिकापेक्षा फार मोठ्या प्रमाणात लागत असतो, आणि त्या बागेमध्ये मध्ये इतर पिक सुद्धा येत नाही त्यामुळे मानोरा तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
त्याचबरोबर तालुक्यामध्ये फळबाग संत्राचे फारमोठे पूर्णपणे नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी राज्य सरकार यांनी 32500 रुपये मदत देऊ अशी घोषणा केली आहे.ती मदत थांबावल्या गेली. सध्या परिस्थितीमध्ये संत्रा बागांचे 100% एवढे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
मानोरा तालुक्यातील फळबाग शेताकऱ्यांजवळ दिवाळी साजरी करण्याकरिता पैशे नाही व राज्यसरकाने 32500 ही मदत पण दिली नाही.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी यांनी विशाल ठाकरे बेलोरा यांच्या शेतामध्ये संत्रा फळांचे झाड जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला व दिवाळी साजरी न करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. येत्या आठ दिवसाच्या आत फळबाग शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पुढील आंदोलन तीव्र करायचा निर्णय घेतला.





