♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरुन उडी मारली”

 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, पुणे

 

पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्याय मिळत नसल्यामुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या (Pune Court) इमारतीवरुन उडी घेऊन एकानं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे न्यायालयासह संपूर्ण पुणे शहरातच खळबळ उडाली आहे.

 

पुणे शहरात बुधवारी (दि.15 ऑक्टोबर) रोजी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्याला न्याय मिळत नसल्याची भावनेमुळे अखेर संबंधित व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.

 

शिवाजीनगर जिल्हा न्यायालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारत जीवन संपवत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणाशी संबंधित प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. पण न्याय मिळत नसल्यामुळे या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

 

ही घटना पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात घडली. केस चालत नाही, न्याय मिळत नाही, यामुळे संतप्त झालेल्या पक्षकारानं थेट चौथ्या मजल्यावरून उडी घेतली.

 

या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तो सध्या बेशुध्द अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उडाला. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129