♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांचे तहसिल कचेरीवर उपोषण”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

ज्ञानेश्वर चव्हाण, वाशिम

 

मानोरा तालुक्यातील उमरी बु. मंडळातील पोहरादेवी व ईतर अतिवृष्टीमुळे बाधित पुर पिडीत ग्रस्तांना घर पडझड झालेल्या लोकांच्या अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूची भरपाई द्यावी.

 

यासाठी खुद लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मानोरा तहसिल कार्यालय मैदानात उपोषणा व्दारे काळी दिवाळी साजरी करण्यात आली. उमरी बु. मंडळातील पोहरादेवी सह ईतर गावात दि.२९ ऑगस्ट २ सप्टेंबर व २७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडला.

 

या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने अनेक घराची पडझड व अन्यधान्य आणि अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. त्यामुळे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी ११.०० वाजता पासुन उपोषण सुरुवात झाली. मा. तहसीलदार साहेब यांनी उपोषणकर्ते यांच्या मागण्या शासनाकडे निधी उपलब्ध झाल्या बरोबर नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली व त्यामुळे लेखी आश्वासन मुळे उपोषण सोडण्यात आले.

 

यावेळी उपोषण करणाऱ्या नागरिकांना बाबासाहेब डेरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या उपोषण मंडपाला या मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये प्रामुख्याने ऍड. श्री. ज्ञायक पाटणी वाशिम, माजी विज मंडळ सदस्य श्री. अनिल गजाधर राठोड, माजी जि. प. अध्यक्ष श्री. अरविंद पाटील इंगोले, माजी पंचायत समिती सदस्य श्री. विजय अनंतकुमार पाटील, श्री. ठाकुरसिंग चव्हाण, श्री. अशोक चव्हाण, मंहत श्री. रमेश महाराज, माजी जि. प. सदस्या श्रीमती स्वातीताई अजयकुमार पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सौ. रेखाताई श्याम राठोड, श्री. निळकंठ पाटील, श्री. प्रकाश राठोड, श्री. इफ्तिकार पटेल, श्री. सुनील जामदार, श्री. राजेंद्र म्हातारमारे सर, माजी सभापती अरुण जाधव, श्री. मधुसूदन राठोड, श्री. उल्हास महाराज, श्री. अनिल नाईक, रविंद्र अंबादास महाराज, श्री. अनंतकुमार राठोड, श्री. धुर्व राठोड, श्री. देवानंद पाटील, श्री. पंजाब पाटील, श्री. श्रावण मेटकर, श्री. गजानन राऊत, श्री. गोंविद राठोड, श्री. अशोक राठोड, श्री. माणिक महाराज, श्री. गोकूळ महाराज, श्री. चंदु केवल जाधव, श्री. गणेश खंडारे, श्री. नंदकिशोर चेनसिंग राठोड, श्री. रमेश पवार, श्री. राजाराम नारायण नाईक, श्री. केशव महाराज, श्री. श्याम राठोड वाईगौळ, श्री. मुकिंद आडे, डॉ. श्री. सुरेश जाधव, श्री. बालकदास कडुकार, श्री. प्रेमदास महाराज, श्री. पृथ्वी राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129