♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“७३ हजारांची लाच घेताना भुसावळच्या तलाठ्यासह तिघे जाळ्यात”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, जळगाव

 

दि.१३ ऑक्टोबर २०२५ जळगाव जिल्ह्यात एकीकडे वाळू माफियांनी धुमाकूळ घेतला असून यातच वाळू वाहतुकीचे वाहन सुरु ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच घेताना भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल व खाजगी पंटर जळगाव एलसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

नुकतीच चोपड्यात अवैध वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यात वाढताना दिसत असून जिल्ह्यात वाळू वाहतूक बंद असलीतरी वरिष्ठांच्या आदेशाने बिनदिक्कतपणे वाळू सुरू आहे.

 

अशातच भुसावळला वाळू वाहतुकीचे वाहन सुरु ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच मागण्यात आली होती. या लाच मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

 

तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या पथकाने लगेच सापळा रचत भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी नितीन केले (रा. वराडसीम) याच्यासह अन्य दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना आज सोमवारी रंगेहात पकडले. ही धडक कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129