
“महायुतीचे सरकार काळात शेतकऱ्याच्या आयुष्यात अंधार”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्याच्या हातात शेतीचे कोणतेही पिक आले नाही.आणि दिवाळीचा आनंदही नाही. शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ₹ ५०,००० अनुदान द्या, या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ‘काळी दिवाळी’ शिदोरी आंदोलन साजरे करणार असल्याचे यवतमाळ -वाशिम खासदार संजय देशमुख यांनी जाहीर केले आहे.
वाशिम-यवतमाळ मतदार संघातील शेतकरी राजा संकटात असल्याने शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन खासदार संजय देशमुख यांनी दि. २१ऑक्टोबर २०२५ वेळ. दु १२ वा. यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर करण्याचे कळविले आहे.





