
“आता बंजारा समाजही रस्तावर उतरतोय”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, बीड
हैदराबाद गॅझेट नुसार एसटीतून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज रंगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदान वर उपोषण केले. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि तसा जीआर सुद्धा काढला.
त्याचप्रमाणे बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेत त्यातील नोंदी नुसार एन टी (ए) ऐवजी अनुसूचित जमाती (एस टी) चे आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.
बीडमध्ये या संदर्भात व्यापक बैठक संपन्न झाली. जिल्ह्याभरातून बंजारा बांधव या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी, हिंगोली येथे सुद्धा अशाच प्रकारची बैठक संपन्न झाली आणि यवतमाळ येथे सुद्धा अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज बांधवा तर्फे (धोळो झेंडा) पांढरे वादळ उठण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात जाणवत आहे.





