♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“दलित महिलेला हॉटेलची रूम नाकारली”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, अकोला 

 

धम्मचक्र दिनासाठी वंचितच्या नेत्या अकोल्यात आल्या होत्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ३ ऑक्टोंबर रोजी जाहीर सभा झाली. या भव्य धम्म मेळाव्याच्या जाहीर सभेला हजेरी लावण्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी अकोल्यात आल्या होत्या.

 

त्या मुक्कामासाठी ‘रायझिंगसन’ या हॉटेलमध्ये गेल्या होत्या. सुरुवातीला त्यांना रूम दाखवण्यात आली. मात्र, त्या सामान आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये पंचशील व निळा ध्वज पाहून हॉटेल व्यवस्थापकाने अचानक रूम देण्यास नकार दिला.

 

प्रवेश नाकारल्याचे कारण वेगळे सांगण्यात आले असले तरी, दलित असल्यामुळेच भेदभाव झाल्याचा आरोप स्नेहल सोहनी यांनी केला.आजही समाजात जाती आणि धर्माच्या भींती समाजात असल्याचं दिसून येत आहे.

 

(दि.3 ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हॉटेल मालक आणि व्यवस्थापकविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाच दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे.

 

यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ५ दिवसानंतरही आरोपी मोकाट शहर वंचितचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास “वंचित स्टाईल”मध्ये हॉटेल प्रशासनाला धडा शिकवू असा इशारा दिला आहे.

 

स्नेहल सोहनी यांनीही न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे सांगत “न्याय मिळेल पण स्वस्त बसणार नाही” असा ठाम इशारा दिला. दरम्यान हॉटेल मालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर दलित महिला नेत्याला केवळ तिच्या ओळखीवरून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातून होत असून न्यायव्यवस्थेची ही मोठी कसोटी ठरणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129