
“महावितरणाच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
देवीचंद राठोड, यवतमाळ
दिनांक 18/10/2025 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास सिद्धेशवर आप्पा देविदास तंबाखे वय वर्ष 60 वर्ष राहणार चिंचगाव, ता. नेर, जिल्हा यवतमाळ हे सकाळी आपल्या शेतात शेती कामा निमित्य जात असताना 11 के वि ची विद्युत तार तुटून शेतकरी सिद्धेशवर तांबखे याच्या अंगावर पडल्या आणि त्या तारामध्ये विद्युत प्रवाह वाहत असल्यामुळे सिध्देश्वर तांबखे यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
विशेष म्हणजे या गावातील हा तिसरा बळी आहे. विधुत महामंडळाच्या चुकीमुळे आज दिवाळीच्या सुरुवातीला शेतकऱ्यचा मृत्यू झाला. महाराष्ट्र न्युज लाईव्ह नेर चे प्रतिनिधी देविचंद राठोड घटना स्थळावर वृत्त संकलन करे पर्यंत आजु-बाजुच्या नागरिकांनी गर्दी केली होती परंतु विधुत महामंडळाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी चौकशी साठी आले नव्हते, त्यामुळे शेतकरी, व गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नेर कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. तसेच मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी मध्ये सामील करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. नेर पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





