
“बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे संपूर्ण बंजारा बांधव यांची सभा”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, वाशिम
सभेमध्ये हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या संविधानिक मागणीसाठी ही बंजारा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे मान्यवर मंडळी उपस्थित होती. या बैठकीला बंजारा समाजाच्या महिला कु. राजश्री शंकर आडे, सौ. छाया सुभाष राठोड, सौ. सीमा प्रकाश राठोड, सौ. डिंपल आडे, अनिता राम राठोड, यांच्या सह इतर महिलांनी हजेरी लावली होती.
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता समाजाच्या वेग-वेगळ्या मान्यवरांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, डॉ. टी. सी. राठोड, प्राध्यापक संदेश चव्हाण (राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना) पुणे येथील वकील, समाजाचे मान्यवर यांच्यासह महाराष्ट्रातून वेगवेगळे जिल्ह्यामधून आलेले बंजारा समाजाचे मान्यवर तसेच महिला मंडळी यांनी आपापल्या सूचना मांडल्या.
ही बैठक सकाळी साडेदहा वाजता सुरु झाली आणि रात्री उशिरा आठ वाजेपर्यंत सुरू होती. बैठक संपल्यानंतर महंत बाबुसिंग महाराज विधानपरिषद आमदार यांच्यासह काही मान्यवर बंजारा समाजाच्या मंडळाची बैठक झाली.
याबाबत आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईचे प्रतिनिधी दिलीपकुमार चव्हाण यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबुसिंग महाराज विधान परिषद आमदार यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता या बैठकीमध्ये सर्व बंजारा समाजाच्या घटकांना सोबत घेऊन मान्यवरांनी एकमताने निर्णय घेतला की, (११-११) लोकांची वेगवेगळी कमिटी तयार करून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करू.
याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडवणीस तसेच भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्याकडे बंजारा समाजाचे आमदार, मंत्री, नेतेमंडळी यांना सोबत घेऊन समाजाच्या मागण्या बाबत चर्चा करू. बंजारा समाजाला या शासनाकडुन निश्चित न्याय मिळेल असा विश्वास बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, विधान परिषद आमदार यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई यांच्यासोबत बोलताना व्यक्त केला.





