
“धान्याच्या मोबदल्यात लाभार्थ्यांना पैसे वाटप”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, अकोला
स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला धान्याचे वाटप करण्यात येत असते. अर्थात गोर गरिबांना याचा लाभ मिळत असतो. मात्र अकोल्यात नागरीकांना रेशन धान्याच्या मोबदल्यात चक्क पैसे वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २५ किलो धान्याच्या मोबदल्यात ३०० ते ३५० रुपये रेशन दुकानदाराकडून दिले जात आहे. अर्थात धान्य वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्य साठा पुरवला गेला आहे. मात्र, अकोल्यात रेशन दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करण्याऐवजी पैसे दिले जात आहेत.
अकोला जिल्ह्यातील गुडधीच्या सरकारी रेशन दुकानात हा प्रकार समोर आला आहे. गुडधी भागातल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातील पैसे वाटपाचा प्रकार उघड झाला. या ठिकाणी थेट रेशन कार्ड धारकांना सरकारी धान्य ऐवजी त्या मोबदल्यात पैसे दिले जात असल्याचा हा प्रकार समोर आहे.
काहींना रेशन कार्डवर प्रत्येकी २० ते २५ किलो धान्य मिळत असेल, तर त्यामागे म्हणजेच धान्य मोबदल्यात ३५० रुपये असे पैसे दिले जातं आहे.
धान्य साठवल्यानंतर बाजारात काळाबाजार?
स्वस्त धान्य दुकानदाराकडून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून धान्य साठा पुरवला गेला आहे. मात्र, अकोल्यात रेशन दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करण्याऐवजी त्यांना धान्याच्या मोबदल्यात पैसे वाटप केले जात आहे.
अर्थात धान्य वाटपात मोठ्या भ्रष्टाचार सुरु असून धान्य साठवल्यानंतर बाजारात काळाबाजार केला जातो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





