
“कारखेडा येथील धोकादायक अवस्थेतील विद्युत खांबे बदलण्याची मागणी”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा तालुक्यातील गव्हा उपविज केंद्रातून वीज पुरवठा होत असलेल्या कारखेडा या गावातील भरवस्तीतील वीजवाहक खांब जमिनीलगत मोठ्या प्रमाणात फुटल्याने (सिमेंट विद्दूत पोलला) भेगा पडल्या मुळे खांब कधी कोसळेल हे सांगता येत नाही, त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवित व शारीरिक हानी झाल्यास त्याची जबाबदारी वीज वितरण कंपनी प्रशासन घेणार काय असा सवाल या धोकादायक वीजवाहक खांबामुळे उपस्थित होत आहे.
स्थानिक गजानन देशमुख यांच्या पिठ गिरणी जवळ असलेला हा विजवाहक खांब वार्ड क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने अनेक वर्षांपूर्वी रोवलेला आहे. या खांबाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून खाली जमिनीलगत आणि मध्यभागी या खांबाची मोठी झीज झालेली असून कुठल्याही क्षणी हा भरवस्तीतील खांब कोसळू शकतो. अश्या अवस्थेत सध्या हा विज वाहक खांब पोहोचलेला आहे.
वस्तीत मध्यभागी आणि रहदारीच्या ठिकाणी असलेला हा विजवाहक खांब जर वीज कोसळला तर या अवजड खांबाच्या वजन आणि जिवंत वीज प्रवाहाने कुठलीही जीवित व शारीरिक, आर्थिक हाणी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल या झिजलेल्या वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या मालकीच्या खांबामुळे निर्माण झाला आहे.
तांड्यामध्ये सुद्धा भरवस्तीत एक लोखंडी वीज वाहक खांब मागील काही वर्षांपासून वाकलेला असून हा कधी धाराशाही होईल हे सांगता येत नसल्याने सिमेंट व लोखंडी खांब तातडीने बदलविण्यात न आल्यास मोठ्या हानीला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत.





