♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?”

 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, पुणे

 

पुणे शहरातील नवले पुलाजवळ ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली. त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासातसमोर आली. ज्यानंतर गौतमीला अटक करण्याची मागणी होते आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला होता.

 

तसंच गौतमीला ट्रोलही केलं जातं आहे. ज्यानंतर गौतमीने आता माध्यमांसमोर येत तिची बाजू मांडली आहे. तसंच आपण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही असंही तिने सांगितलं आहे. यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते. मी कारमध्ये नव्हते, कार माझ्या चालकाकडे होती. अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते. माझी कार माझ्या कारचालकाकडे होती. शिवाय मला जेव्हा समजलं की अपघात झाला तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला.

 

माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली. मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की जे काही चाललं ते आपण कायदेशीर करु.

 

म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. मी गरीब घरातूनच आलेली मुलगी आहे. माझ्याकडून मदत पाठवली होती. पण त्यांनी ती मदत नाकारली.

 

पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला त्यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं. मात्र त्यांनी मदत नाकारली, कायदेशीर सगळं करु असं सांगितलं त्यामुळे मी गप्प बसले. पण नंतर कुणी काहीही बोलतं आहे.

 

ज्याला काहीच अर्थ नाही असंही गौतमीने सांगितलं. मला नाहक बदनाम केलं जातं आहे-गौतमी पाटील जिथे माझा काही संबंध नाही, तिथे माझं नाव बदनाम केलं जातं आहे.मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिलं.

 

कारची कागदपत्रं, चालकाचे तपशील, अपघात झाला तेव्हा मी कुठे होते? ही सगळी माहिती मी पोलिसांना दिली आहे. ही माहिती मी सार्वजनिक केली पाहिजे असं मला वाटत नाही.

 

कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी आता करते आहे. मी कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले नाही हे बरोबर आहे. कारण माझ्या तारखा आधी घेतलेल्या असतात.

 

समोरुन मला ॲडव्हान्स येतो, खर्च खूप झालेला असतो. त्यामुळे मी माझी कामं रद्द करु शकत नाही. माझे भाऊ लोक तिथे होते, त्यांना छान छान रिप्लाय दिले गेले. आता जे काही घडलं आहे ते माध्यमांना माहीत आहे. अशी उत्तरं दिल्यानंतर मी कशी काय जाणार? त्यामुळे मी शांत बसले.

 

पण आज चार पाच दिवस झाले की मला प्रचंड ट्रोलिंग केलं जातं आहे. मी सुरुवातीपासून मी ट्रोल झाले आहे. मी चांगलं केलं तरीही मला वाईट म्हणतात आणि वाईट केलं तर बदनामी करतातच. अपघात व्हायला नको होता हे मला मान्य आहे.

 

मला चालकाने सांगितलं की मी कार नेतो आहे. तो बहुदा देवाच्या ठिकाणी गेला होता. अपघातानंतर माझं आणि कार चालकाचं बोलणं झालेलं नाही असंही गौतमीने सांगितलं. माध्यमाशी गौतमीने संवाद साधला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129