
“पोहरादेवी येथे बंजारा समाजाचा उपोषण”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण देण्यात यावे यासाठी रमेश पवार हे तीर्थक्षेत्र पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील बंजारा विरासात या वास्तू संग्रहालय समोर दि. ९ सप्टेंबर पासून उपोषणाला बसले आहेत.
या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष बाबुसिंग नाईक, भटके विमुक्त महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर आडे आदी मान्यवर उपोषण मंडपात उपस्थित होते. यावेळी मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबुसिंग नाईक यांनी महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई चे प्रतिनिधी अशोक रत्नपारखी यांचे सोबत केली बातचीत केली.





