
“संत गोरोबाकाका समाज उन्नती बहुउद्देशीय समिती स्थापन”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, अमरावती
सुरेश महादेवराव नांदूरकर व सौ. निर्मला सुरेश नांदुरकर दोघेही निवृत्त प्राध्यापक आहेत. ते अमरावतीला वास्तव्याला आहेत. त्यांनी संत गोरोबाकाका समाज उन्नती बहुउद्देशीय समिती स्थापन केली.
कुंभार हा अल्पसंख्याक समाज आहे आणि परिस्थितीने गरीब सुद्धा आहे. आमची मुले हुशार आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या मागासले असल्यामुळे त्यांची प्रगती झालेली नाही, त्यामुळे काही समाज बांधव एकत्र येऊन या हुशार विद्यार्थ्यांना मदत कशी करायची याबाबत विचारविनिमय करून संत गोरोबाकाका समाज उन्नती बहुउद्देशीय समिती स्थापन करून त्या समितीद्वारे आमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. ती मदत कशाप्रकारे दिली जाते याबाबत सुरेश महादेवराव नांदुरकर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.





