
“मा. खुशाल सोरते यांची अमित शहा युथ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, नागपूर
अमित शहा युथ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी मा. खुशाल सोरते नागपूर यांचे निवड करण्यात आली. त्यांचा समाजकारण व राजकारण यांच्याशी जवळचा संबंध असून ते वाडी नगर परिषद परिसरामध्ये मोलाचे कार्य केले आहे. ऑल इंडिया पोलीस टाइम्सचे ते नागपूर विभाग संपादक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रासह मध्म प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान, दिल्ली गुजरात राज्याशी संपर्क असून त्यांचा स्वभाव मन मिळावू आहे. त्यांनी प्रत्येक राज्यात माणसे जुळवली आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे राष्ट्रीय अध्यक्ष एस के शुक्ला यांनी त्यांची अमित शहा युथ ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करून त्याच्या निवडीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तसेच अमित शहा युथ ब्रिगेडचे राष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरावरचे सर्व पदाधिकाऱ्यामार्फत ही त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. ऑल इंडिया पोलीस टाईमच्या परिवाराकडून तसेच टीमकडून सुध्दा मा. खुशाल सोरते त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.





