♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“शाळकरी विद्यार्थीनीची एस.टी. बस पलटली”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

अशोक रत्नपारखी, वाशिम

 

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील कोंडाळा- सुराळा येथून तोरणाळा येथील शाळेत वीध्यार्थीनीनां घेऊन येणारी मानव मिशन ची ही गाडी तोरणाळा फाट्याजवळील महादेवाच्या मंदिराजवळील वळवावर एस टी पलटी झाली आहे.

 

वाशीम किन्हीराजा रोडच्या नीर्मानीधीन कामामुळे वारंवार अपघात होत आहेत हे येथे उल्लेखनीय आहे. किन्हीराजा ते वाशिम मार्गाचे रुदीकरण व सपाटीकरण करण्याचे काम वेगाने सुरू असून या रोडच्या नीर्मानाधीन कामाच्या बेजबाबदार पणामुळे अनेक वाहनांचे अपघात होत असून संबंधीत ठेकेदाराच्या नियोजन शुन्य कारभारामुळे हे अपघात होत आहेत.

 

त्यात अनेक जण जख्मी झाल्याच्या अनेक घटना या रोडवर घडत असून आज मानव विकास मीशनची एस टी बसही तोरणाळा फाट्याजवळ पलटी झाली परंतू सुदैवाने वाहक व चालक तसेच वीध्यार्थीनी ना कोणतीही दुखापत झाली नाही, ही समाधानाची बाब आहे.

 

किन्हीराजा वाशीम मार्गाच्या नुतनीकरनाचे काम सुरू असून या रोडचे ठेकेदार यांनी अनेक वेळा अनेक चुका केल्या असून या रोडवर वारंवार अपघात होत आहेत मैराळडोह गावाजवळील एरंडा गावाजवळ ही मोठ मोठ्या नाल्या या रोडवर पडल्या असून या ठिकाण अनेक मोटरसायकल स्वार पडण्याचे प्रकार घडत आहेत.

 

मैराळडोह गावाजवळील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात अनेक मोटरसायकली फसतात तर रोडवरील फक्त गीट्टीच टाकण्यात आल्याने अनेक वाहने ही जागेवरच फिरतात मोकळी टाकलेली गिट्टी ही गेल्या १० दिवसापासून तशीच पडली असून ठेकेदारांच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होत आहे.

 

तर ज्या ठिकाणी पुलाचे वा रोडच्या सपाटी करणाचे का सुरू आहे. त्याच ठीकाणी अनेक जागी अपघात होत आहेत. त्यांच्याच चुकीमुळे आज वाशीम आगाराची एम.एच ०७ शी ९४२४ क्रमांकाची बस ही सुराळा ते तोरणाळा फाट्याच्या मधात महादेव मंदिराजवळील वळण रस्त्यावर पलटी झाली मात्र वीद्यार्थीनी वाहक चालक यांना धक्काही लागला नाही. या रोडच्या नीर्मानाधीन कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रोडवर योग्य ते फलक लावण्यात यावेत आणि कामावर संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129