
“दगडपारवा येथे बंजारा समाजाचा संवाद मेळावा संपन्न”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
संजय चव्हाण, अकोला
दगडपारवा येथे बंजारा समाजाचा संवाद मेळावा संपन्न झाला. या संवाद मेळाव्यात महंत जितू महाराज पोहरादेवी, महंत रायसिंग महाराज राजगड, हिरासिंग राठोड, दिलीपराव जाधव माझी जिल्हा परिषद अध्यक्ष, मधुकर पवार, सतीश मखराम पवार, जय किसन राठोड सरपंच, पोलीस पाटील, बंजारा समाजाचे कार्यकर्ते यांच्या सह संपूर्ण अकोला जिल्हातुन बंजारा समाज बांधव तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष पप्पू भाऊ चव्हाण हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नायक कारभारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. मा.ना संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री यांची रथा मधुन मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भजनी मंडळींना नंगारा भेट देण्यात आली. दगडपारवा येथील बंजारा संवाद मेळाव्याला रायसिंग महाराज, जितू महाराज यांनी मार्गदर्शन केले.





