♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“दिवसा बँकेत नोकरी आणि रात्री मटक्याचे आकडे”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

प्रकाश चव्हाण, पुणे

 

दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असणाऱ्या पुण्यातील एका उच्चशिक्षित बँक कर्मचाऱ्याच्या प्रताप समोर आला आहे.

 

पुण्यात एका बँक कर्मचाऱ्याचा ऑनलाईन मटका जुगारात सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी बँकेत नोकरी करणाऱ्या राहुल दिलीपसिंग परदेशी (वय ४२, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, बेनकर वस्ती, धायरी गाव) याला अटक केली आहे.

 

त्याच्यासोबत ऑनलाईन मटका खेळणाऱ्या आणखी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल परदेशी हा B.Com पदवीधर आहे.सध्या तो बँकेत नोकरी करतो. दिवसा बँकेतील कामकाज सांभाळून रात्री ऑनलाईन मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 

या प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार आशिष जाधव व इरफान नदाफ हे पोलीस ठाण्यात असताना, त्यांना माहिती मिळाली की निळू फुले जलतरण तलावाजवळ एक व्यक्ती मोबाईल फोनद्वारे मटक्याचे आकडे सांगून जुगाराचे बुकींग घेत आहे.

 

 

ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करून तात्काळ पथक रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तेथे एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना आढळून आला. त्यावेळी राहुल परदेशी याला ताब्यात घेण्यात आले.

 

 

पोलिसांनी झडती घेतली असता राहुलकडून 562 रुपये रोख, मोबाईल फोन, असा एकूण 3562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात, त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स तपासल्यानंतर त्याने १७ वेगवेगळ्या व्यक्तींना मटक्याचे आकडे पाठवून बुकींग घेतल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान राहुल परदेशी याने कबूल केले की, तो सुरज ज्ञानेश्वर गायकवाड याच्यासाठी काम करत होता.

 

तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना मटक्याचे आकडे पाठवत असे आणि त्याबदल्यात रोख रकमेसह विविध मनी ट्रान्सफर अ‍ॅप्सद्वारे पैसे स्वीकारत असे.

 

या प्रकरणात खडक पोलिसांनी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे विशाल शेडगे (रा. लोहियानगर), सुरज ज्ञानेश्वर गायकवाड (रा. खडकमाळ आळी), मुकेश सातपुते (रा. पानघंटी चौक), प्रतीक बनकर (रा. झगडेवाडी), विजयसिंग बाळारामसिंग परदेशी (मामा) (रा. घोरपडी पेठ), शिवा धनगर (रा. पदमावती), सुनिल वाघ (रा. सिंहगड रोड), बालाजी दत्तात्रय गट्डे (रा.सदाशिव पेठ), सचिन मधुकर सुपेकर (रा. पर्वती दर्शन), सचिन पालवे (रा. शिवतेजनगर, कोथरुड), विलास दिवाणे (रा. खडकमाळ आळी, राठी वाडा), रहीम शेख (अब्दुल रहिम हजारी शेख) (रा. एम जी रोड, कॅम्प), शुभम गोडसे, अन्ना शिंदे (रा. बिबवेवाडी), शुभम सुरेश कामदुले (रा. खडकमाळ आळी), अक्षय सुभाष तेलवडे यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129