
“देवदर्शनासाठी नेलेल्या विद्यार्थ्यांच्या पिकअपचा अपघात”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील धोञा तांडा येथील शाळेतील विद्यार्थीना शिक्षकांनी पारवा येथे देवदर्शनाला नेले असता परतीच्या वेळी पिकअप वाहन पलटी झाल्याने चार शिक्षकासह चौदा विद्यार्थी जखमी झाले असुन तिन शिक्षकासह चार विद्यार्थ्यांना पुढील ऊपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
पालकांची कुठलीही पुर्व परवानगी न घेता विद्यार्थ्यांना देवदर्शनाला नेणार्या शिक्षकांवर आणी मुख्याध्यापकावर कारवाई करुन नियमबाह्य वाहतुक करणार्या पिकअपवरही वाहनांवर कारवाई करण्याची पालकांनी मागणी केली आहे.
सध्या नवराञ सुरु आहे, दर्शनासाठी भावीकांची रिघ लागत आहे. विद्यार्थ्यांना पारवा येथील देवीच्या दर्शनासाठी मंगरुळपीर तालुक्यातील धोञा तांडा शाळेतील शिक्षकांनी देवदर्शनासाठी नेले.
यासाठी पालकांची तसेच शिक्षणविभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहीती मिळाली आहे. देवदर्शनासाठी विद्यार्थांचाही नकार होता तरीही शिक्षकांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना नेले यामागे काय हेतु होता याविषयी चर्चा होत आहे. पारवा येथुन देवदर्शन घेवुन पिकअपमध्ये विद्यार्थी बसवले आणी परत येत असतांना सदर पिकअप वाहन पलटी झाली.
या अपघातामध्ये चार शिक्षक आणी चौदा विद्यार्थी जखमी झाले. अपघाताची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन जखमींना रूग्नवाहीकेव्दारे ऊपचारासाठी मंगरुळपीर येथील ग्रामीण रूग्नालयात नेले. प्राथमिक ऊपचार करुन अपघातामध्ये गंभीर असलेल्या चार विद्यार्थी आणी तिन शिक्षकांना पुढील ऊपचारासाठी रेफर केले आहे.
विनापरवानगी विद्यार्थ्यांना देवदर्शनासाठी नेणे यासाठी सबंधित मुख्याध्यापकांसह दोषी शिक्षकांवर कायदेशिर कारवाई करावी तसेच नियमबाह्य वाहतुक करणार्या पिकअपवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिस काय भुमिका घेतात आणी कुणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





