
“व्यसन मुक्ती साठी रामस्नेही सांप्रदायाची समाजाने प्रेरणा घ्यावी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
भांबोरा येथे साई मिलन पॅलेस साईधाम भांबोरा या ठिकाणी दिनांक २७/०९/२०२५ रोजी श्री.श्री. १००८ सदगुरु सुखरामजी महाराज यांच्या अनुभव बाणीजीवर रामस्नेही सांप्रदायाच्या अनेक संतांनी प्रवचन केले.
दिनांक २८/०९/२०२५ रोजी सकाळी कार्यक्रम समाप्ती व कार्यक्रमाची सांगता झाली. हा सतसंगतीचा कार्यक्रम कै. मोहन राठोड यांच्या सतरावी निमित्त आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रामस्नेही सांप्रदायांचे मान्यवर ॲड. माणिक चव्हाण दारव्हा, डॉ. दिलीप चव्हाण दारव्हा, प्राध्यापक प्रल्हाद चव्हाण अमरावती, मा. देवानंद पवार साहेब यांनी स्वर्गीय मोहन राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ चव्हाण अमरावती यांनी केले.





