
“कु. राजश्री आडे यांची मुलाखत”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
दारव्हा येथे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण मिळावे या संविधानीक मागणी साठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बंजारा समाजाच्या महिलांनी आवार्जून उपस्थिती लावली होती.
कु. राजश्री शंकर आडे यांनी महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई सोबत बातचीत केली. आम्हची बंजारा समाजाची मागणी आहे ती संविधानिक आहे. राजश्री आडे यांनी काही पुरावे सांगितले आहे. ते पुरावे माझ्या एस टी च्या बांधवांनी तपासावे म्हणजे त्यांना खरे पटेल की बंजारा समाज आदिवासी बांधवांच्या हक्काचे आरक्षण मागत नाहीत असेही त्या म्हणाल्या. कु. राजश्री शंकर आडे यांची मुलाखत ज्ञानेश्वर चव्हाण यांनी घेतली.





