
“दारव्हा येथे बंजारा समाजाचा महामोर्चा”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दारव्हा येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दारव्हा, मानोरा, कारंजा, नेर, दिग्रस, आर्णी आणि इतर जवळच्या तालुक्यातील तमाम बंजारा बांधव, महिला भगीनी बंजारा समाजाचा पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटियर लागू केले आहे. या गॅझेटिमध्ये बंजारा समाजा हा एसटी प्रवर्गात होता, अशा नोंदी आहेत. त्या नोंदीनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी या संविधानीक मागणी साठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा वसंतराव नाईक सभागृहात, कविता मंगल कार्यालय पासून झाशी राणी चौक ते एस टी बसस्टॉड दारव्हा मार्गे गोळीबार चौका पर्यंत काढण्यात आला.
गोळीबार चौकात या मोर्चाला समाजांच्या मान्यवरांनी संबोधन केले. यात सर्वश्री सौ. शांता राम जाधव, किशोर पालत्या, संतोष चव्हाण, प्रा. किशोर राठोड, कु. राजश्री शंकर आडे, श्री. संदेश चव्हाण (गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष) आदींनी मार्गदर्शन केले.
मोर्चाला मार्गदर्शन सुरु असतांना विशेष बाब म्हणजे जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला, तरीही मोर्चा मध्ये आलेले बंजारा समाजाच्या माता भगिनी तथा पुरुष मंडळी हे भर पावसात एक इंच सुद्धा हालले नाही. भर पावसात बंजारा समाजाच्या माता भगिनी पुरुष मंडळी खबिंरपणे उभे होते. तेव्हा मा. शरदचंद्रजी पवार साहेबांची साताऱ्यातील सभेची आठवण झाली.
आयोजन गोर बंजारा आरक्षण कृती समिती दारव्हा, तथा समस्त गोर बंजारा समाज दारव्हा शहर व तालुका यांनी एका लेखी निवेदनाद्वारे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मोर्चकरांच्या वतीने करण्यात आली.
हा मोर्याला यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने सुशील राठोड माझी उपाध्यक्ष नगरपरिषद दारव्हा, गजेंद्र चव्हाण माझी आरोग्य सभापती नगर परिषद दारव्हा, डॉ. मनोज राठोड बालरोग तज्ञ, राम जाधव, भरत जाधव, दिलीप जाधव (नायक), अंबादास जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण (कारभारी), उत्तम जाधव, किशोर पालत्या, प्रा. किशोर राठोड, संतोष चव्हाण, समाधान आडे, रवि जाधव, यांच्यासह गोर बंजारा आरक्षण कृती समिति दारव्हा, तथा समस्त गोर बंजारा समाज दारव्हा शहर व तालुका यांनी तसेच समस्त बंजारा समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
याच सोबत दारव्हा पोलीस ठाण्याचे पो. नि. शिवप्रकाश मुळे यांच्या सह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चासाठी चोख बंदोबस्त ठेवला.
उपविभागिय अधिकारी कार्यालय दारव्हाच्या वतीने शासनाने प्रतिनिधी म्हणून मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी संजय जाधव नायब तहसीलदार दारव्हा हे मोर्चाच्या मंडपात उपस्थित होऊन त्यांनी निवेदन स्वीकारले. राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली.





