
“विशेष पोलीस महानिरीक्षकाची सामका आयुर्वेद वेलनेस सेंटरला भेट”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ
यवतमाळ येथील नागपूर- तुळजापूर रोडवरील सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर गोधनी येथे उभारण्यात येत असलेल्या स्वामी विवेकानंद स्मारक प्रकल्पाला कोलकत्ता येथील विशेष पोलीस महानिरीक्षक अमित भरत राठोड यांनी या प्रकल्पाला भेट दिली.
स्मारकात कोलकत्ता येथूनच स्वामी विवेकानंदांची मूर्ती आणली जाणार आहे. त्याआधी स्मारकाचे बांधकाम आराखडा व परिसराची पाहणी करण्यासाठी श्री. अमित भरत राठोड यांनी या स्थळाला भेट दिली.
त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली. अशा प्रकारच्या ऐतिहासिक व प्रेरणादायी स्मारकाची उभारणी यवतमाळमध्ये होत आहे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हे स्मारक स्वामी विवेकानंदाच्या विचाराचा प्रसार करणारे केंद्र ठरणार आहे.
या ठिकाणी अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास व संस्कार केंद्र तसेच आयुर्वेद व योगाच्या माध्यमातून आरोग्यवर्धनाचे मार्गदर्शन होणार आहे. स्मारक निर्मितीसाठी सर्व समाज बांधवांनी आर्थिक हातभार लावावा असे आवाहन वैद्य पंकज पवार यांनी केले आहे.





