
“दारव्हा येथे बंजारा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी भव्य मोर्चा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, यवतमाळ
आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दारव्हा येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघत आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटियर लागू केले आहे. या गॅझेटिमध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात होता अशा नोंदी आहेत.
त्या नोंदीनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दारव्हा नगरपरिषद चे उपाध्यक्ष सुशील राठोड, आरोग्य सभापती गजेंद्र चव्हाण, डॉक्टर मनोज राठोड, बालरोग तज्ञ यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यांच्यासोबत बातचीत केली.





