♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“घरकुलासाठी मागितली २ हजार रुपयांची लाच” 

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, बीड 

 

पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे ‘बे बाकी’ प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर सुरेश ठोंबरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

 

एका ३५ वर्षीय पुरुषाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. ठोंबरे यांनी तक्रारदाराच्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती.

 

तडजोडी अंती ही ४ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. १९ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीने केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रूपये घेताच त्याला पथकासमोर रंगेहाथ पकडण्यात आले.

 

पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सोपान चिटमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार अनिल शेळके, अविनाश गवळी आणि अंबादास पुरी यांनी ही कारवाई केली. ठोंबरे याच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129