♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“वाहनाचे पीयूसी वैध नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, मुंबई 

 

प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला कठोर सूचना दिल्या आहेत. “भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर काही पर्यावरणपूरक निर्बंध घालून घेणे गरजेचं असल्याने प्रत्येक वाहनाला दिलं जाणारं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) हे वैध असणं गरजेचं आहे.

 

अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी,” अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.

 

परिवहन आयुक्त कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर उपस्थित होते.

 

सरनाईक म्हणाले, “राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे वाहनाचा क्रमांक स्कॅन केला जाईल. यामुळे संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. हे प्रमाणपत्र वैध नसल्यास इंधन दिले जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

मंत्री प्रताप सरनाईक पुढं म्हणाले , राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सिसीटिव्ही कॅमेरा चर्चा आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून ) जाईल.

 

जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही आणि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून देण्याची व्यवस्था देखील केली जाईल.

 

जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते.

 

भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्येही प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यामुळे रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल.

 

परिणामी प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने मोठी धडक मोहीम राबवावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी यावेळी दिल्या.

 

दरम्यान, बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत घेतला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129