
“बंजारा महिला प्रवक्ता यांचे बंजारा आरक्षणाबाबत मागणी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
बंजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील जेष्ठ पत्रकार तथा सेवा भूमीचे संपादक श्री. शंकर आडे यांची मुलगी बंजारा महीला प्रवक्ता कु. राजश्री शंकर आडे यांनी सध्या राज्यात आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने बंजारा समाजातील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन उभारु आणि जोपर्यत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरूच राहील असे महीला प्रवक्ता कु. राजश्री शंकर आडे यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चे पत्रकार अशोक रत्नपारखी यांच्याशी बोलताना सांगितले.





