
“अरुणावती नदीला महापुर”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा तालुक्यात संततधार अतिवृष्टी स्वरुपाचा मुसळधार पाऊस पडल्याने अरुणावती नदीला महापुर आल्याने रोहणा, जवळा, हिवरा, कोंडोली, मानोरा, रामतिर्थ, कारखेडा, वरोली, सेवादास नगर या नदी काठाशेजारील शेतात महापुराचे पाणी गेल्याने शेंकडों शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान होऊन शेती खरडून गेली आहे.
अरुणावती नदीला दुपारी चार वाजताचे दरम्यान अरुणाव तीला महापुर आल्याने नदीने रुद्रररुप धारण केले. अरुणावती नदीचा महापुर अंदाजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुर न उतरल्याने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर गावचा महापुर उतरेपर्यंत विद्यार्थीसह नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागले आहे तसेच जवळा, हिवरा गावचे शेतकरी रमेश राऊत, मिरा भोयर, हरिओम राऊत यांचे शेतातील कपाशी, स़ंत्रा बागायतीच्या शेतात महापुराचे पाणी घुसल्याने शेतातील पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मागील ऑगस्ट महिन्यात असाच अरुणावती नदीला पूर आला होता. या गाव भागातील शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यापासून शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला नसल्याचे या भागातील नुकसानग्रस्त शेतकरीवर्गातून बोलल्या जात आहे.
शासन, प्रशासनाने अरुणावतीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पहाणी करुन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. अरुणावतीचे महापुर उतरण्यासाठी महीलांनी अरुणावती नदीपात्रेची पुजा करुन निसर्ग राजाला साकडे घातले.





