
“लद्दाखमध्ये कर्तव्य बजावताना धुळ्याचा सुपुत्र देशासाठी शहिद”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, धुळे
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावचा सुपुत्र दिनेश तुफान पावरा (वय २७) हा भारतीय सैन्यदलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत होता. ७ सप्टेंबर रोजी लद्दाख येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार रस्त्याच्या कामासाठी सुरुंग लावल्यानंतर अचानक दगड अंगावर पडल्याने ही घटना घडली. दोन वर्षांपूर्वी दिनेश पावरा लष्करात दाखल झाला होता.
त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई-वडील आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. शहीद जवानाचे पार्थिव ८ सप्टेंबरच्या रात्री शेमल्या येथे आणण्यात आले असून, ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.





