
“महाविकास आघाडीचे जन सुरक्षा विधेयक विरोधी धरणे आंदोलन”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, बसमत
वसमत येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणाऱ्या महायुती सरकारच्या जनसुरक्षा कायद्यास विरोध करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सह महाविकास आघाडी नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचंड निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी जनसुरक्षा कायद्या विरोधी मनोगत मांडताना ॲड. रिशीकेश देशमुख, शेख अलीमुद्दीन यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.





