
“हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण द्यावे”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, बीड
आमदार, श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित 228 गेवराई विधानसभा मतदारसंघ जिल्हा बीड यांनी दिनांक 8/9/2025 रोजीच्या पत्र जावक क्रमांक 917 या पत्रांन्वये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडवणीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32.
यांना या पत्राअन्वये मराठवाड्यातील बंजारा (लबाण) समाजाला हैदराबाद स्टेट गॅजेटियर (१९२०) नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देणे बाबत या पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करण्यात आली आहे.
मराठवाडा हा प्रदेश सन 1948 पर्यंत निजामशाहीत हैदराबाद राज्याचा भाग होता. त्या काळातील हैदराबाद गॅजेटियर मध्ये 1920 लांबडा बंजारा लमान समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे. बंजारा म्हणजेच लबाण समाज मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.
माननीय आमदार महोदय यांचे पत्रामध्ये गॅझेट मधील 1920 च्या उताऱ्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. दिनांक 2/ 9 /2025 च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅजेटियर लागू केले असून त्याच शासननिर्णयाचा आधार घेऊन
मराठवाड्यातील बंजारा म्हणजे लबान समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे( एसटी) प्रवर्गात सामील करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्याची सुयोग्य कारवाई करावी ही नम्र विनंती. अशाप्रकारे गेवराईचे आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांनी एका पत्राद्वारे या मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे.
बहुदा करून विजयसिंह शिवाजीराव पंडित हे महाराष्ट्रातील एकमेव पहिले आमदार आहेत. ज्यांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये सामील करून लाभ देण्यात यावा. अशी मागणी करणारे महाराष्ट्रातील हे प्रथम आमदार आहेत.





