♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“८ वर्षे जनतेला लुटले, आता दिवाळी साजरी करताहेत”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीप चव्हाण, नागपुर 

 

जीएसटी कमी करता येत होता, तर तो गेली आठ वर्ष का कमी केला नाही? याचे उत्तर केंद्र सरकार देणार आहे का? जनतेकडून ज्यादा टॅक्स वसूल का केला? याचे उत्तर आधी द्यावे, मग सरकारने श्रेय घ्यावे, असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

 

हे सरकार जेव्हा लोकांवर अन्यायकारक जीएसटी लादत होते. तेव्हा काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला आणि विरोध केला.

 

जीएसटी कर कमी करावा, त्यावर कॅप लावावी, अशी मागणी राहुल गांधी गेले आठ वर्ष सातत्याने करत होते. परंतु, निवडणुकीत फटका बसेल या भीतीने केंद्र सरकारने जीएसटी आज कमी करून त्याचे श्रेय घेण्याचे काम सुरू केले आहे?

 

गेली आठ वर्ष लोकांना लुटले त्याची जबाबदारी सरकार घेणार का? जर जीएसटी कमी करता येत होता तर तो गेली आठ वर्ष का कमी केला नाही, याचे उत्तर सरकार देणार का? जनतेकडून ज्यादा टॅक्स वसूल का केला याचे उत्तर आधी द्यावे मग सरकारने श्रेय घ्यावे. लोकांना लुटले आणि आज दिवाळी साजरी करत आहेत असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129