
“अकोला शहरातील चार हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, अकोला
अकोला शहरातील चार हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात ‘बनवाबनवी’ झाल्या बाबतची माहिती त्यामध्ये आधार कार्ड व शपथपत्रावर वेगवेगळी जन्म तारीख असून घोटाळ्याचे उदाहरण व पुरावे म्हणून १०० लोकांच्या नावाची यादी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी प्रशासनाकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी रामदास पेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती सादर करून घोटाळ्यातील १०० लोकांची यादी दिली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या तपासाची स्थिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्या सोबत भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.





