
“शेंदुरजना गावामध्ये मागील एक महिन्यापासून ग्रामसेवक अनुपस्थित”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, वाशिम
शेंदुरजना या गावामध्ये मागील एक महिन्यापासून ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे गावातील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले आहे. यामुळे सलग ३ दिवस ग्रामपंचायतीचे काम बंद झाले.
गावकऱ्यांनी बीडीओ साहेबांना याबाबतची तक्रार दिल्यानंतर बीडीओ साहेबांनी दोन येत्या दोन दिवसांमध्ये तुमचे रखडलेले काम पूर्ण करू असे गावकऱ्यांना आश्वासन दिले, तसेच १ तासाच्या आत ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच असे कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले.
सर्व गावकरी मंडळीने ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहून ग्रामपंचायतीचे लॉक उघडले व त्यांच्या तक्रारी व त्यांचे प्रश्न ग्रामपंचायत कार्यालयात मांडले असता सोमवार दिनांक २२/०९/२०२५ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली.





