♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“अकोल्यातील मोकाट कुत्र्यांवर कारवाई करा”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

संजय चव्हाण, अकोला 

 

अकोल्याच्या रस्त्यावर दिवसरात्र भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक दिली. सुप्रीम कोर्टाने ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार आवारा कुत्र्यांना पकडून शेल्टर होम्समध्ये हलविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही अकोल्यात आजतागायत काहीच हालचाल झालेली नाही, अशी कडवट टीका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.

 

शहरातील सिंधी कॅम्प, राणी सतीधाम, खोलेश्वर, जठारपेठ चौक, उमरी, रेल्वे स्टेशन, अकोट फैल, डाबकी रोड आदी भागात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक दररोज भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. तरीही प्रशासन मात्र गप्प आहे.

 

सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश जर जिल्हा प्रशासनाला लागू नसतील तर अकोल्यात वेगळं न्यायालय सुरू करावं काय? असा जळजळीत सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. आदेश असूनही कारवाई न करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आवारा कुत्र्यांना पकडून शेल्टर होम्समध्ये हलवावे,अशीमागणी करण्यात आली.अकोला महानगरपालिका व पशु कल्याण विभागावर जबाबदारी निश्चित करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू करावी, शेल्टर होम्सची माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी, रेबीज प्रतिबंधक मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबवावेत असे नमूद करण्यात आले आहे.

 

तर यावेळी रस्त्यावरचा कुत्रा कोणत्याही क्षणी चावा घेऊ शकतो, पण प्रशासन मात्र झोपेत आहे. आदेश सुप्रीम कोर्टाचा, अंमलबजावणी मात्र कागदावरच! अशी बोचरी टीका करत शिवसेनेने तात्काळ उपाययोजना करण्याचा इशारा दिला.

 

या निवेदनावेळी शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड यांच्यासह सागर पुरणे, राजेश दांडेकर आदींची उपस्थिती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129