
“मनपा आयुक्तांचा दणका, लेट येणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, पुणे
दोन आठवड्यांपूर्वी देखील महापालिका आयुक्तांनी उशिरा येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळ पाळण्याची तंबी दिली होती. त्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचे समोर आले होते.
महापालिकेचे जे अधिकारी, कर्मचारी वेळेत कामावर येऊन शिस्त पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वी दिला होता.
कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५
शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेत उशिरा आलेल्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले.
अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या यामध्ये वर्ग १ ते वर्ग चार मधील सुमारे ५०० पेक्षा अधिक जणांचा समावेश असून, या सर्वांना उशिरा आल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. त्यासाठी पालिकेकडून रोजच्या कामाच्या तासात वाढ करून शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
त्यानंतरही विभागप्रमुख आणि कर्मचारी दिलेल्या वेळेचे पालन करत नसल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्या नावांची नोंद घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यामध्ये सहा विभागप्रमुखांसह ५०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
जे कर्मचारी, अधिकारी उशिरा आले त्यांच्या वेळेची नोंद घेत. त्यांना उशिरा आल्याची नोटीस देण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.