
“मानोरा येथील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
मानोरा शहरातील पंचायत समिती ते बस स्थानक पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता लगतचे अतिक्रमण बुधवारी दि. २७ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी हटविले. यावेळी काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाला सहकार्य केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरात राष्ट्रीय महामार्ग लगतच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणाने वेढा घातला होता. रस्त्यावर भजे, जिलेबी, पान टपरी, चहा कॅन्टीन, मिसळ दुकान, फळ विक्रेता व इतर व्यवसायासाठी थाटलेल्या कॅबिन पोलिसांनी स्वतःहून शहरातील अतिक्रमण हटविल्याने शहरातील दुतर्फा रस्ते मोकळे श्वास घेत आहेत.
ठाणेदार श्रीमती नैना पोहेकर यांनी आपले स्वतःचे अधिकाराचा वापर करून पोलिसांचा ताफा सोबत घेऊन शहरातील राष्ट्रीय महामार्ग लगतचे अतिक्रमण हटविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.